Showing posts with label मी तुझ्यावर प्रेम करतोय.. Show all posts
Showing posts with label मी तुझ्यावर प्रेम करतोय.. Show all posts

Wednesday, November 28, 2007

मिर्त्रन्नो मी मला आवदालेल्या काही कविता पोस्ट करतो आहे...
या सर्वा दुसर्यानी लिवाल्याला आहेत...

मी तुझ्यावर प्रेम करतोय.

तुझं ते निरागस बोलणं,
मला खूप आवडतं
चारचौघांतही तुझं वेगळेपण,
अगदी आपसुखच जाणवतं.

तुझ्या डोळ्यांत दिसून येतो,
माझ्यावरचा अतोनात विश्वास
खळखळून हसणं तुझं
खरचं वाटतं झकास.


तुझा तो मिश्कीलपणा,
आणि ते खोडया करणं
जराजरी रागावलो मी तरी,
चटकन डोळ्यांत पाणी काढणं.

माझा प्रत्येक शब्द,
तू किती सहजपणे जपतेस
सांग बरं ही कला
कोणत्या शाळेत शिकतेस?

तुलाही फ़ुलाप्रमाणे जपण्याचा,
मी आटोकाट प्रयत्न करतोय
अभिमान वाटतो मला माझा
की मी तुझ्यावर प्रेम करतोय.